भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राहुल दळवी

भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधानसभेच्या उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली. या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. जाहीर केलेल्या यादीत शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झाली आहेत.

तिसरी यादी आली तरी त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांची नावे नसल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खडसे यांनी मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळण्याची शक्यता पाहून आधीच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. गुरुवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणे यांनाही भाजपने तिकीट दिलेलं नाही. मात्र, त्यांचं नाव शेवटच्या यादीत येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या विनोद तावडे यांना विधानपरिषदेचं नेतेपद देण्याच्या हालचाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बावनकुळेंचं पुनर्वसन होणार का याबाबत माध्यमही अद्याप अनभिज्ञ आहेत.

मी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या शरद पवार यांनी केलेल्या विधानस काहीच अर्थ नाही असं खडसेंनी स्पष्ट केलं. मी कधीच राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो आणि नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयावर मी पूर्ण विश्वास ठेवायचे ठरवले आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप खडसेंना उमेदवारी देणार का ? खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत जाणार का ? खडसे अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार का? खडसे निवडणुकीतून माघार घेणार का? अशा अनेक ‘का’ ची सर्व उत्तरे उद्याच मिळणार आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Comment