मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही ?? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही बांधील आहोत. आधी स्थगिती तर उठवा असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. या प्रकरणात भाजपाला मुळीच राजकारण करायचं नाही. मात्र सरकार मराठा आरक्षण प्रकरणी गंभीर नाही हा आमचा आरोप आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलवून एकदा बैठक घेण्याचं नाटक ठाकरे सरकारने केलं. मात्र मराठा आरक्षण प्रश्नी पुढची दिशाच ठरलेली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पाच जणांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण न्यायचं आहे ही भूमिका अयोग्य नाही मात्र आधी स्थगिती तर उठवा. सुप्रीम कोर्टाने दिलेली अंतरिम स्थगितीही या सरकारला उठवता आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजला आहे. कर्नाटक सरकारने ८ लाख विद्यार्थ्यांची फिजिकली घेतली आणि  त्यांची काळजीही घेतली. काही विद्यार्थी बाधित झाले असतील. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांच्याबाबती महाराष्ट्रात गोंधळ सुरु आहे असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. शाळा आणि महाविद्यालयं कधी सुरु होणार हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे असंही ते म्हणाले.

यापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी योग्यरित्या बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने राज्य सरकारची मागणी मान्यही केली,  मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली पाहिजे, असेही सरकारलाही वाटते. परंतु, आपल्या हातात काही नाही. मराठा समाजाने आक्रमक होता कामा नये. न्यायालयीन लढाई ही रस्त्यावर लढून चालणार नाही. आपल्याला घटनापीठासमोरच आपली बाजू मांडली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment