मला व्हिलन ठरवण्यात आलंय , पण मी योग्य वेळ आल्यावर बोलेन – खडसेंच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाथाभाऊ शुक्रवारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. जाता जाता एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे,त्यांनी माझा खूप छळ केला अस वक्तव्य केले. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता मला व्हिलन ठरवण्यात आले आहे पण योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच बोलेन अस फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले,” नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. तसेच ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांनी कसल्या ऑफर द्यावा. त्या अर्जुन खोतकर यांना कोण विचारतयं, ते कसली ऑफर देऊन राहिले? (पंकजाला दिलेल्या ऑफरवर) एकही भाजपचा नेता कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीनर फडणवीस यांनी दिली.

तीन दिवसांच्या दौऱ्यात भीषण परिस्थिती पाहिली. पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे, तिथं माती आणावी लागेल. मराठवाड्यात काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवर आहे. आज मुख्यमंत्र्यांनी 80 ते 90 टक्के पंचनामे झाले असे सांगितले. मात्र, वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलेली नाही. आमच्या पाहणीत 70 ते 80 टक्के पंचनामे झालेले नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दौऱ्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

GST चे सर्व पैसे केंद्र सरकार देतंय. राज्याची 60 हजार कोटींची अजूनही कर्ज काढण्याची पत आहे. राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो, जो केंद्राला पाठवला जातो. त्यानंतर केंद्रीय पथक येऊन पाहणी करतं. महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून कांगावा केला जातोय. यापूर्वी शरद पवार कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्राला नेहमी मागितल्या पेक्षा कमी मदत मिळाली आहे. केंद्राने या काळात 27 हजार कोटी मागितले तेव्हा कुठे 3 हजार कोटी मिळाले. पण मोदी पंतप्रधान असताना राज्याला एकूण 25 हजार कोटींपैकी 11 हजार कोटी मिळाले, म्हणजे तिप्पट पैसे मिळाले. ज्यांनी 3 हजार रुपयांचे चेक वाटप केले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment