‘हे गांधी किंवा खानचे सरकार नाही!’ भाजप खासदार परवेश वर्माने पुन्हा एकदा केलं वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात चिथावणीखोर भाषण केल्याबाबद्दल भाजप खासदार परवेश वर्मा यांच्यावर निवडणूक आयोगाने भाषण बंदी घातली होती. दरम्यान, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अर्थसंकल्पावरील अभिभाषणावर बोलण्याचा भाजपने सर्वात आधी मान परवेश वर्मा यांना दिला. यावेळी वर्मा यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केलं आहे. पश्चिम बंगालचे खासदार असेलेले परवेश वर्मा यांनी शाहीन बागेत होत असलेल्या विरोध प्रदर्शनावरून काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘हे गांधी किंवा खान यांचे सरकार नाही. सरकार सीएएबाबत एक पाऊल सुद्धा मागे हटणार नाही. परवेश वर्मा इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विरोधकांना ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्यास सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आणि सभागृहाबाहेर जात सभात्याग केला.

शाहीन बागेत सुरु असलेल्या प्रदर्शनाबाबत परवेश वर्मा म्हणाले, ”शाहीन बागेत नागरिकत्व कायद्यास विरोध होत नसून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. भारतात राहून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. मला अशा लोकांना सांगायचे आहे की हे गांधी किंवा खान यांचे सरकार नाही. हे मोदींचे सरकार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सीएए मागे घेणार नाही.”

ते पुढे म्हणाले, विरोधकांना असं वाटतं की आम्ही सांप्रदायिक आहोत. भारत हा रामची भूमी आहे असे जर आपण म्हणत असू तर आम्हाला सांप्रदायिक घोषित केलं जात. घटनेच्या मूळ आवृत्तीत राम आणि सीतेचाही उल्लेख आहे. तथापि, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वेळोवेळी यांनी घटनेतील तरतुदी काढून टाकल्या. मी तुम्हाला विचारतो, भारतीय घटना सांप्रदायिक आहे का?” अशी विचारणा करत वर्मा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. दरम्यान, वर्मा यांच्या विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? काँग्रेसची भाजपवर टीका

Leave a Comment