भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ‘ज्योतिरादित्य शिंदेचा’ भाजप पक्षप्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी 2.55 ला घेण्यात आला. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी काँग्रेसमध्ये नवं नेतृत्वा मान्य होत नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले.

 माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment