लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | माधुरी दीक्षित, कपिल देव यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींना २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या कल्पनेवर भाजप नेतृत्वाचा विचार असल्याचे समजत आहे. बाॅलिवुड अभिनेते, खेळाडू आदिंना स्टार प्रचारक करुन भाजप २०१९ ला पुन्हा निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागले आहे.

‘स्टार’ प्रचारकांच्या माध्यमातून शहरी मतदारसंघांमध्ये वातावरण निर्माण करून विजय निश्चित करण्याचा भाजप चा प्रयत्न आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, भप्पी लहरी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कपिल देव, माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग आदी स्टार प्रचारकांचा भाजप विचार करत आहे.

तसेच हेमामालिनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबूल सुप्रियो, व्ही. के. सिंह यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे. मात्र यावेळी काहींचे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान बंडखोर शत्रुघ्न सिन्हा यांनी यंदा भाजपकडून निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment