अबकी बार २२० के पार ; साथ में शिवसेना का मोडका संसार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढले मात्र येती विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर भाजप फेरविचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची काल कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यभरातून भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे असे ठणकावून सांगितले. तर २८८ जागी तयारीला लागा असे भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितले.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपला १२२ जागी विजय मिळाला तर शिवसेनेला ६३ जागी विजय मिळाला होता. यावेळी भाजप आणि शिवसेनेत सध्या तरी युती आहे. शिवसेनेने धरलेल्या हेक्यानुसार शिवसेनेला फिफ्टी फिफ्टी जागा द्यायच्या आहेत. त्यामुळे भाजपाला हा निर्णय सारखाच सलतो आहे. त्यात शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी भाजपला आत्ताच सळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना नाकात दम आणण्याआधी भाजप त्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजपच्या गतवेळी निवडून आलेल्या १२२ जागा आणि शिवसेनेच्या ६३ जागा यांच्यात तुलना करायची झाल्यास २८८ जागापैकी २० जागा अन्य मित्र पक्षांना दिल्यास १३५ -१३५ जागा शिवसेना भाजपला मिळणार आहेत. भाजपला अवघ्या १३ जागांवर अधिक लढण्याचा फायदा होत आहे. तर शिवसेनेला ७२ जागांवर लढण्याची अजब लॉटरी लागणार आहे. त्यात शिवसेना मुख्यमंत्री पदावर चांगलीच टपून बसली आहे. अशात भाजप काय खेळी करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment