सेना-भाजपाला बंडखोरांचा फटका? ३० जागांवर विरोधकांना फायद्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरललेल्या शिवसेना-भाजपा महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमधील या बंडखोरीचा आघाडीला तब्बल ३० जागांवर फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ५० मतदारसंघात तब्बल १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचा फटका शिवसेना-भाजपाला बसण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये स्वंतत्र लढलेल्या सेना-भाजपाने युती केल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. शिवाय आयात उमेदारांना तिकिट मिळाल्यामुळेही पक्षातील नाराजी समोर आली. यामुळे काही इच्छुक नेत्यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघे घेण्याच्या दिवशी काहींची नाराजी दूर करण्यात महाआघाडीला यश आले.

मात्र, जवळपास ३० जागांवर बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर आघाडीला फायदा आणि युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे. मराठवाडा, पुणे, कोकण, सोलापूर आणि नाशिकमधून बंडखोरांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment