ब्राह्मण महासंघाने दिली ना.धो. महानोर यांना धमकी; साहित्य संमेलनात जाण्यास केला मज्जाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. उस्मानाबाद येथे पार पडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर असल्यानं त्यांना या संमेलनात न जाण्याची धमकी महासंघाने दिली आहे.

स्वतः महानोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी पत्र देऊन आपल्याला ही धमकी दिल्याची माहिती दिली. तसेच आपल्याला विविध जिल्ह्यांमधून फोन आले आणि धमक्या देण्यात आल्या असाही आरोप ना.धो. महानोर यांनी केला आहे.

“१० जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे तो संकेत पाळूनच ही निवड झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही” हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं मात्र तरीही त्यांनी तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका असं मला बजावलं आहे असं महानोर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment