Breaking | १४ एप्रिलनंतरही जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन येत्या १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहता १४ एप्रिलनंतरही जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशांतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतरही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीय. त्यामुळे देश तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची भीती व्यक्ती करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी देशातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सिविल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. या चर्चेत देशातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टन्स हाच एक पर्याय असून. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे सोशल डिस्टन्सवर भर देणे आणि ज्या जिल्ह्यात प्रादुर्भाव नाही आहे अशा जिल्ह्याच्या सीमा सील करण्याबाबत एकमत दिसून आले. या संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळं येत्या १४ तारखेला लॉकडाउन हटल्यानंतर सर्व जिल्ह्यातील व्यवहार, बाजार, जनजीवन पुन्हा सुरु होणार असं वाटत असताना हा लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याची माहिती आजच्या बैठकीतून समोर आली आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्हा पातळींवर हायड्रोक्सोक्लरोक्वीनच्या दहा हजार गोळ्या आल्या असल्याचीही माहिती आहे. या औषधाचा कोरोना रुग्णावर प्रभावी वापर होत असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९० वर, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

 

Leave a Comment