Breaking | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार; २४ तासात ५२५ रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे. या नवीन ५२५ रुग्णानंतर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३७२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात ७५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर त्यानंतर तामिळनाडूचा क्रमांक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचा परिणाम लॉकडाउनच्या कालावधीवर सुद्धा होऊ शकतो. आज लॉकडाउनचा दहावा दिवस असून वाढत जाणारी संख्या पाहता. येत्या १४ एप्रिलला लॉकडाउन संपणार आहे. मात्र,  कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत गेली तर लॉकडाउनचा काळ आणखी वाढणार असल्याची शक्यता आता दाट होताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment