अमरावतीमध्ये भावानेच केली भावाची हत्या ; १ आरोपी अटक तर २ फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी ।  अमरावती जिल्हाच्या परतवाडा येथे काल रात्री १० दरम्यान सख्या भावाने मित्रांच्या मदतीने भावालाच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश कंगाले वय (२२)  रा. मुगलाई असे हत्या झालेल्या भावाचे नाव असून सागर रम्मु कंगाले असे आरोपी भावाचे नाव आहे.

घटनेच्या रात्री आरोपी व म्रुतक यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.  या वादाचे रूपांतर हाणामारीत होताच सागरने अमीत राऊत व मयूर कानेटकर यांच्या मदतीने आकाशवर कमरेच्या मागे धारधार शस्त्राने वार करून त्याला जबर जखमी केले. तेव्हा आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडला. तेव्हा त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात  हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा म्रुत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले.

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आतापर्यंत एक आरोपीला अटक केली आहे. तर उर्वरीत मुख्य सुत्रधार व आणखी एक असे २ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment