अर्थसंकल्प 2020: जम्मू-काश्मीरमधील नवीन रेल्वे प्रकल्पांची होऊ शकते घोषणा, सर्व जिल्हे रेल्वेने जोडले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । जम्मू-काश्मीरला यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्पाप्रमाणेच रेल्वे अर्थसंकल्पाकडून सुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत. राज्यात रेल्वे नेटवर्क पसरविण्याबरोबर प्रलंबित रेल्वे मार्गाचे प्रकल्प आणि रेल्वे विभागातील कामही सुरू होण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्गाची घोषणा होण्याची धाकट्या आहे. यात कठुआ-बासोली-भादरवाह रेल्वे मार्ग, जम्मू-अखनूर-रजोरी रेल्वे मार्ग आणि बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्ग यांचा समावेश असू शकतो. दरम्यान, जम्मू-अखनूर-राजोरी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

कलम ३७० काढल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल होत आहेत असा सरकारचा दावा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा मोठा वाटा आहे, पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे हे सर्वात सोपे साधन आहे. त्यामुळं यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात सरकार जम्मू आणि श्री माता वैष्णो देवी कटरापर्यंत जाण्यासाठी नवीन गाड्यांची घोषणा करू शकते. धार्मिक पर्यटन म्हणून विकसित झालेल्या कटरा रेल्वे स्टेशनला मॉडेल रेल्वे स्टेशन बनविण्याचा पुढाकार सरकार घेऊ शकते. त्याचबरोबर जम्मूमध्येही रेल्वे विभाग सुरू होण्याची शक्यता आहे.

जम्मूचे एडीआरएम रमनिक सिंह याच्या मते, जम्मूमध्ये रेल्वे विभाग तयार झाल्यास रेल्वे प्रकल्पाला गती मिळेल आणि यामुळे राज्यातील पायाभूत रेल्वे सुविधा आणखी मजबूत होईल.

मागील अर्थसंकल्पांच्या घोषणा जमिनीवर दिसत नाहीत

२०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जम्मू रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. निधी मंजुर होऊन तीन वर्ष झाले तरी रेल्वे स्थानकासाठी दुसऱ्या प्रवेशद्वाराचे काम जमिनीवर दिसत नाही आहे. या कामाधी वस्तूंचे गोदाम बारी ब्राह्मण येथे स्थानांतरित केले जाणार होते परंतु अद्याप गोदाम हलविण्यात आले नाही.

सर्व राज्याच्या राजधानीशी कटरा रेल्वे स्थानक जोडले गेले नाही

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या घोषणेला चार वर्षे लोटल्यानंतरही कटरा स्थानक सर्व राज्याच्या राजधानीशी संपर्क साधू शकलेला नाही. २०१५ मध्ये रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सर्व राज्याच्या राजधानीपासून कटरापर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याविषयी घोषणा केली होती. ओडिशा, तेलंगणा, कर्नाटकला जाण्यासाठी येथून कोणतीही रेल्वे सेवा नाही.

बजेट सादर होण्याआधी वित्त मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना १० दिवस खोलीत बंद करतात; हे आहे कारण..

#budget2020: बजेटमध्ये राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली जाऊ शकते, देशात पार्सल पाठवणे सोपे होईल

खुशखबर ! 15 फेब्रुवारीपर्यंत 3 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये पोहचणार, आपले नाव असे चेक करा

Leave a Comment