नॉन-गजेटेड पदांकरिता सरकार नेशनल रिक्रूटमेंट एजेंसीची स्थापना करणार; सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग बदलेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । नॉन-गजेटेड पदांच्या भरती प्रक्रियेत सरकार मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२० च्या अर्थसंकल्प जाहीर करताना सांगितले की, नॉन-गजेटेड (non-gazetted post) पदांच्या भरतीसाठी राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन केली जाईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नॉन-गजेटेड पदांवर भरतीसाठी एकच परीक्षा घेतली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नॉन-गजेटेड पदावर भरतीसाठी विशेष सर्वसाधारण चाचणी म्हणून राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. नवीन प्रस्तावाप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र सुरू केले जाईल. विशेषत: महत्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये ही परीक्षा केंद्रे सुरू केली जातील.

Leave a Comment