बुलेटला अज्ञात वाहनाची धडक; जागीच मृत्यू झालेला चालक इंडियन आर्मीतील जवान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रीय महामार्गावर तळबीड येथे बुलेट चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुलेटचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सुनिल चौधरी असे मृत्यू झालेल्या बुलेट चालकाचा नाव असू तो पिंपरी चिंचवड येथे राहणारा आहे. बुलेटवर आर्मी असे लिहिलेले असल्याने मृत व्यक्ती जवान असल्याची चर्चा आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग चारवर शनिवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी बुलेट चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुलटचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव सुनिल चौधरी असून ते शोभा मधूकर तळेकर, यांचे येथे संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड येथे राहणारे अाहेत. पुण्याकडे जात असताना कराड तालुक्यातील तळबीड पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला. विशेष म्हणजे सदर युवकाने हेल्मेट घातलेले असूनसुद्धा अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, तळबीड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक घटनास्थळी पोहोचले असून ते प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क झालेला नसून युवकाच्या जवळ मिळालेल्या बॅगेतून कागदोत्रांच्या आधारे शोध घेतला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

पुण्याहून गावाकडे जाणार्‍यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?

Coronavirus Update | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार | HM WhatsApp News Bulletin | 22 मार्च

Leave a Comment