मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘आमदार’ होण्याचा मार्ग मोकळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी 28 मे आधी विधीमंडळाचा सदस्य बनणं आवश्यक आहे.

मात्र, सध्या कोरोनाचं संकट पाहता ही विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने घेण्यात आला. आता या शिफारशीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निर्णय घेणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

 

Leave a Comment