राडा! चंद्रकांत खैरे समर्थक आणि शिवप्रेमी आमनेसामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामागील शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. खैरेंचं राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा वाटत असतानाच एमआयएम आणि भाजपसोबत शिवसेनेतील अंतर्गत विरोधकांकडूनही खैरे यांनाच लक्ष्य केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमधील बजाजनगर परिसरात शिवस्मारकाच्या उडघटनाप्रसंगी राडा झाल्याचं निदर्शनास आलं. शिवस्मारक उदघाटनावेळी चंद्रकांत खैरे यांनी भाषण करु नये असं सांगितलेलं असतानाही त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला.

परिणामी चंद्रकांत खैरे आणि शिवप्रेमींमध्ये राडा झाला. बजाजनगर भागातील सिडकोच्या जागेवर अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रातोरात पुतळा बसविला होता. तेथे महाआरती करण्यात येत होती. आरती झाल्यावर तेथे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना आमदार संजय शिरसाठ दोन्ही आले. संजय शिरसाठ भाषणास उठताच शिवभक्तांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशा घोषणाबाजी सुरू केल्या त्या वरून मोठा गदारोळ झाला या वेळी दोन्ही नेत्यांना शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment