अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेतील वादावरून राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला नाही. हे तर होणारच होतं, आम्हाला आनंद होण्याच काही कारण नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार नाहीत, अब्दुल सत्तार मंत्रिमंडळात कायम राहतील अशी प्रतिक्रिया हरिभाऊ भागडे यांनी दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाच नाही असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई बोलत आहेत. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर सत्तार यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी दिली आहे मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहेत.

Leave a Comment