छगन भुजबळांना मोठा धक्का! माणिकराव शिंदेंचा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्यानंतर येवल्यातून शिवसेनेनं संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. कारण, भुजबळांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्याशी हात मिळवणी केली आहे. निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेची ताकद वाढली अशी चर्चा आहे.

दरम्यान, येवल्यात भुजबळ आणि पवार असा सामना येवल्यात रंगणार आहे. येवला विधानसभा मतदारसंघातून संभाजी पवार यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. येवला हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. गेल्या काही दिवसांआधी भुजबळ सेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं भुजबळांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता सेनेनं संभाजी पवार यांना भुजबळांविरोधात लढण्यासाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात २८८ जागांवर निवडणुका पार पडणार आहेत. त्यातील येवला विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. २००४ पासून येवल्यामध्ये छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. जर २०१९ मध्येही छगन भुजबळ यांचा करिष्मा दिसला आणि ते जिंकून आले तर या जागेवर ते सलग ४ वेळा निवडून येणारे नेते ठरतील.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment