मुख्यमंत्र्यांचा राजीनामा! आता काय करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। राज्यात सत्ता कोणाची हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असल्याचे सांगत आहे. दरम्यान सत्तास्थापनेसाठी थोडाच अवधी उरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना आपला राजीनामा सादर केला. यावेळी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.

याचबरोबर आता मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. या राजीनाम्यानंतर आता फडणवीस काय करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. त्याचबरॊबर मुख्यमंत्र्यांना मुदतवाढ मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दुपारी ४.३० वाजता फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तेव्हा आता मुख्यमंत्री या परिषदेत आपली काय भूमिका मांडतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Comment