राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं गिफ्ट; ५ दिवसांचा केला आठवडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करावे लागेल.

मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर त्यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पण सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवारी सुट्टी मिळणार आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment