मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट; मंत्री आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या सोबत मंत्री आदित्य ठाकरे यांची हि यावेळी उपस्थिती होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंची उपस्थिती हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत.

आपल्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे सायंकाळी 5.30 वाजता नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर ते सायंकाळी 6 वाजता सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. साडेसात वाजता ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यासोबत काय चर्चा करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे विमानतळावर स्वागत केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि मोदींची अवघ्या काही मिनिटांची ओझरती भेट झाली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे मोदींची सदिच्छा भेट घेतली. या नियोजित भेटीत काय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment