हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं रोखटोख भाषण केले. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा अस आव्हान त्यांनी यावेळी भाजपला दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जालं, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील,”

“महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेज जन्माला आलं, ते तेज कायम आहे. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. नुसतं गरगर फिरुन काय उपयोग, भोवराही गरगर फिरतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या शुभदिनी सहकुटुंब हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment