एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं डराव डराव करतायत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबियांवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं रोखटोख भाषण केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करतानाच राणे कुटुंबियांवरही निशाणा साधला.राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी  आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. काहीजणांचा समाचार घेणे महत्त्वाचे आहे.गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे – उद्धव ठाकरे 

“महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेज जन्माला आलं, ते तेज कायम आहे. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. नुसतं गरगर फिरुन काय उपयोग, भोवराही गरगर फिरतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment