काँग्रेस नेत्याची संजय राऊत यांच्याशी ‘गहन’ चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम हे लीलावती रुग्णालयात गेले आहेत.

संजय राऊत यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून आज दुपारी २ वाजतापर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. राऊत यांना भेटण्यासाठी लीलावतीमध्ये कालदेखील अनेक मोठे नेते आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनीही त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. सत्तासंघर्षात आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडणारे नेते म्हणून संजय राऊत यांनी मोठा किल्ला लढवला होता.

मात्र, तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ते घरी जातील. अशी माहिती त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.

Leave a Comment