कॉंग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या दैदिप्यमान अश्वमेधाला रोखण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते आता निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत. बाळासाहेब थोरात यांनी मागे सांगितल्या प्रमाणे छाननी समिती काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता असून यात अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीला पराभूत झालेल्या उमेदवारांना काँग्रेस पुन्हा संधी देणार असल्याचे चित्र काँग्रेसच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले असून मित्र पक्षांसाठी ३८ जागा सोडण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी केला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसच्या छाननी समितीच्या अध्यक्षांनी महाराष्ट्रातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची निवड करण्याचे ठरवले आहे. छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे आहेत. तसेच छाननी समितीत काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा देखील समावेश आहे.

कॉंग्रेसच्या पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार 

पृथ्वीराज चव्हाण – कराड

अशोक चव्हाण – भोकर

बाळासाहेब थोरात – संगमनेर

यशोमती ठाकूर – तिवसा

विजय वडेट्टीवार – ब्रम्हपुरी

नितीन राऊत – नागपूर उत्तर

नाना पटोले – साकोली

बसवराज पाटील – उमरगा

वर्षा गायकवाड – धारावी

प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य

Leave a Comment