काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये प्रवेश करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही काँग्रेसला लागलेली गळती थांबलेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (९ ऑक्टोबर) शिरपूरमध्ये सभा होत आहे. या सभेतच ते भाजपात प्रवेश करणार आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसला लागलेली गळती प्रचार सुरू झाल्यानंतरही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याच कार्यक्रमात “शिरपूरचे आमदार अमरिश पटेल हे काही दिवसात भाजपामध्ये येणार आहे,” अशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यामुळे पटेल लवकरच काँग्रेसला हात दाखवणार हे निश्चित झालं होतं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पटेल यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. त्यानंतर आज (९ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळ्याच्या दौऱ्यावर असून, शिरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे. या सभेतच आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार अमरिश पटेल म्हणाले, “मी विकासाला मानणारा माणूस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा विकास केला आहे. पाच वर्षापासून ते काम करत आहे. माझ्या मतदारसंघाचाही मला विकास करायचा आहे. विकास करण्यासाठी सत्तापक्षाची मदत लागते. त्यामुळे मी भाजपात जात आहे,” असं पटेल म्हणाले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment