बिहारमध्ये अवतरली कोरोना देवी? महिला करतायत पूजा; जाणून घ्या सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. भारतातही त्याचे मोठ्या प्रमाणात संक्रमण सुरु आहे. देशात प्रशासनाच्या वतीने संक्रमणास अटकाव घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना बाधित रुग्ण संख्या २ लाखाच्या वर गेली आहे. शास्त्रज्ञ जीवाचे रान करून लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.  या सगळ्या वातावरणात बिहारमध्ये कोरोना देवी अवतरली आहे. या अफवेमुळे बिहार, उत्तर प्रदेश येथील महिलांनी या देवीचे पूजन करण्यास सुरुवात केली आहे. या अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान ही अफवा छत्तीसगड, हरयाणापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि येथील बायका आपापल्या पद्धतीने पूजा करत आहेत. याबाबत एक दणकट पसरवण्यात आली आहे. तसेच या देवीचा वारही ठरविण्यात आला आहे. सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी देवीची पूजा केली जात आहे. . या अंधश्रद्धेच्या अफवांवर विश्वास ठेऊन फरीदाबादमधील बसंतपूर कॉलनीत राहणाऱ्या महिला यमुना किनारी पूजेसाठी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. Covid -१९ असा विषाणू असल्याने शेवटचा अंक ९ आहे म्हणून देवीला ९ गोष्टी अर्पण केल्या जात आहेत. यामध्ये ९ फुले, नऊ पेढे वा लाडू, नऊ धूप किंवा अगरबत्ती, नऊ दिवे अर्पण केल्याचे सांगितले जात आहे.

एका शेतात काही महिला काम करत होत्या तेव्हा शेतात चरणाऱ्या गायीने महिलेचे रुप घेतले. भीतीने घाबरणाऱ्या महिलांना थांबवत तिने त्यांना मी कोरोना देवी आहे. माझी पूजा केल्यास तुमच्या घरी कोणाला कोरोना संसर्ग होणार नाही असा दृष्टांत दिला असे सांगितले जात आहे. दरम्यान अशी कोणतीही पूजा करून कोरोना जाणार नाही. कोरोना पासून बचावासाठी सामाजिक अलगाव तसेच विलगीकरण आवश्यकत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अशा भ्रामक अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहनही केले जात आहे.

Leave a Comment