आता प्रत्तेक जिल्हा मुख्यालयाची निर्मिती कोरोना रुग्णालयात, रात्रीत १०० बेड अन् २५ व्हेंटिलेटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या १३६ कोरोना रुग्ण आहेत. यापार्श्वभुमीवर प्रत्तेक जिल्हा मुख्यालयाची निर्मिती कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. गावपातळीवर कोरोना हेल्पलाईन नंबर बनवण्यात आला असून तलाठी, सरपंच यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामिण भागातही वाढताना दिसतोय. यामुळे शासनाकडून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. खबरदारी म्हणुन राज्यातील प्रत्तेक जिल्ह्यात आता कोरोना रुग्णालयाची निर्मिती होणार आहे. यासाठी जिल्हा मुख्यालयाची इमारत वापरली जाणार आहे. या कोरोना रुग्णालयांमध्ये प्रत्तेकी १०० बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच २५ व्हेंटिलेटर असणारा एक स्वतंत्र वार्डही बनवण्यात येणार आहे.

दरम्यान, आज रात्रीपर्यंत किवा जास्तीत जास्त दोन दिवसांमध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना शासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’ म्हटल्याप्रमाणे शासन कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, घरातून बाहेर पडू नये आणि स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १३६ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment