कोरोना इफेक्ट: कोल्हापूरच्या चंदगडमध्ये खाजगी दवाखान्यांना कुलूप; रुग्णांचे हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर
राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सगळेच हवालदिल झालेत. अशा वेळी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य विभाग झटत आहे. पण कोरोनाच्या धास्तीपोटी इतर आजारांवर उपचार करणारे खाजगी डॉक्टर दवाखाने बंद करत असल्याचे समोर आलय. महाराष्ट्रात ही परिस्थिती दिसून आल्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी खाजगी दवाखाने बंद करू नयेत लोकांचे उपचार करणे गरजेचे आहे असं आवाहन केलं. मात्र, तरीसुद्धा काही ठिकाणी असणारे क्लिनिक बंद ठेवण्यात आली आहेत.

देशावर ओढवलेल्या या संकटामुळे डॉक्टर देवदूताचे काम करत असताना खेड्यापाड्यात असणारी खाजगी क्लिनिक्स बंद झाल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या प्रत्येक परिसरातले खाजगी दवाखाने पूर्ण बंद केल्याने ग्रामीण भागातील लोकांसमोर उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती न बाळगता डॉक्टरांनी लोकांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment