सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंथा । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्यास सांगितलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं होतं. परंतु, हे करत असताना जर तुम्ही दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर केल्यास तुम्हाला ही चूक महागात पडू शकते.

म्हणूनच दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर करू नका अशा सूचना केंद्र सरकारने देशातील जनतेला दिल्या आहेत. यामागचं एक वैज्ञानिक कारण म्हणजे अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. आणि सॅनेटायझरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळं दिवे लावण्याआधी जर तुम्ही सॅनेटायझर वापरलं तर कदाचित त्याचा काही अंश तुमच्या हातावर राहिल्यास आगीच्या संपर्कात आल्यास तुमचा हात भाजला जाऊ शकतो.

म्हणून, दिवे लावण्याआधी सॅनेटायझरचा वापर करू नका अशा सूचना केंद्र सरकारने देशातील नागरिकांना दिल्या आहेत. या संदर्भात लष्करानेही अशाच काही सूचना केल्या आहेत. दिवे लावण्याआधी सॅनेटायझर न वापरता हात स्वच्छ धुवून घ्या, असं लष्करानं म्हटलंय. पीआयबचे मुख्य महासंचालक के. एस. धातवालिया यांनी पत्रकार परिषदेत,“रविवारी रात्री दिवे लावताना अल्कोहोलचा समावेश असणारे हँड सॅनेटायझर वापरू नका.” असे स्पष्ट आवाहन नागरिकांना केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

 

 

Leave a Comment