दिग्गज खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका ; दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू  कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही.

कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता.कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment