‘cut-copy-paste’चा जनक अनंतात विलीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संगणकावर किंवा कुठल्याही स्मार्ट गॅजेटवर काम करताना cut-copy-paste हे तीन पर्याय तुम्ही वापरलेच असतील. या तीन पर्यांयाशिवाय तुम्ही संगणक किंवा स्मार्ट फोन वापरण्याची कल्पनाच करू शकत नाही. मजकूर असो वा डिजिटल फाईल यासंबंधीच्या प्रक्रियेत आपण cut-copy-paste हमखास वापरतोच. आपल्यापैकी तर अनेकजण ऑफिसमध्ये दिवसातून शेकडो वेळा cut-copy-paste या पर्यायाचा वापर करत असतीलच. मात्र, अशा महत्वाच्या सुलभ संगणकीय पर्यायाला जन्माला घालणारे ”लॅरी टेसलर” यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. कंप्युटर वापरणे सुलभ व्हावं म्हणून लॅरी यांनी १९७० च्या दशकात cut-copy-paste चा पर्याय शोधून काढला होता.

१९४५ साली न्यूयॉर्कमध्ये लॅरी यांचा जन्म झाला. त्यांनी स्टॅण्डफोर्ड येथे कंप्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी काही काळ आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयवर संशोधन केलं. १९७३ साली कंप्युटर श्रेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या अँलन के यांनी लॅरी यांना झेरॉक्स कंपनीच्या पॅलो ऑल्टो रिसर्च सेंटर (पीएआरसी) येथे नोकरीची संधी दिली. पीएआरसीमध्येच लॅरी यांनी cut-copy-paste तंत्रज्ञानाचा शोध लावला.

माहिती पुन्हा पुन्हा लिहिण्याऐवजी अगदी काही क्षणांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी हा पर्याय लॅरी यांनी शोधून काढला. वापरण्यास सोप्पा असणारा cut-copy-paste चा हा पर्याय नंतर कंप्युटींगचा अविभाज्य भाग बनला. आज तर कंप्युटरबरोबरच स्मार्टफोनमध्येही हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ग्राफिक युझर इंटरफेस आणि माऊसच्या हलचालींसंदर्भातील संशोधन आणि अभ्यासाठी पीएआरचे नाव घेतले जायचे. या अनेक संकल्पनाच्या मागे लॅरी यांचीच मेहनत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment