विषारी वनस्पती खाल्ल्याने तब्बल ४५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
शेतात चरायला गेल्यावर विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीतील वडगाव राजदी येथील ४५ जनावरे दगावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती सध्या गंभीर आहेत.

दरम्यान, गावातील गुराख्याने जनावरे चरायला नेली असता ढोरकाकडा नावाची वनस्पती जनावरांच्या खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली. त्यामुळे ४५ जनावरांचा मृत्यू झाला. पशु वैधकिय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी औषधोपचार केले. मात्र जनावरांनी ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात खाल्लेली असल्याने ते वाचू शकले नाहीत.

या परिसरात हिवाळ्यात वाढणारी धोरकाकडा वनस्पती जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी या वनस्पतीपासून जनावरांना दूर ठेवावे असे आवाहन केले आहे. दरम्यान जनावरे दगवल्याने वडगाव राजदी येथील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment