गर्दीत अडकलेले केजरीवाल उमेदवारी अर्ज न भरताच परतले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम हॅलो महाराष्ट्र : भाजपला विधानसभेत धूर चारण्यास पुन्हा सज्ज झालेले अरविंद केजरीवाल आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र रॅलीत जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे अरविंद केजरीवाल यांना उमेदवारी अर्जच दाखल करता आला नाही. आता केजरीवाल उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
अरविंद केजरीवाल रॅलीतच म्हणाले की, आज दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता पण कार्यालय दुपारी तीन वाजता बंद होते. मला उद्या उमेदवारी दाखल करावा लागेल असे मला सांगण्यात आले पण   तुम्हाला सोडून मी कसा जाऊ शकतो.  मी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करीन.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केजरीवाल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. वाल्मिकी मंदिर ते पटेल चौक असा रोड शो काढून मतदारांचं अभिवादन स्वीकारत ते चालले होते. रोड शो दरम्यान त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केजरीवाल ठिकठिकाणी लोकांना संबोधित करत होते. भेटत होते. समर्थकांच्या गर्दीतून वाट काढताना त्यांना बराच उशीर झाला. निवडणूक कार्यालयात आपण वेळेत पोहोचू शकणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत: तसं जाहीर केलं.

 

Leave a Comment