जेएनयू हल्ल्यातील ‘त्या’ हल्लेखोर तरुणीची ओळख पटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । जेएनयू हल्ल्यामधील व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हल्लेखोर मुलीची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. मुलीचं नाव कोमल शर्मा असून, ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

जेएनयू परिसरात झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात एक तरुणी तोंडाला रुमाल बांधून हातात काठ्या घेऊन दिसून आली होती.त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला असता, त्या चेहरा झाकलेल्या मुलीचं नाव कोमल शर्मा असल्याचं उघड झालं होतं. कोमल शर्मा ही दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, ती द्वितीय वर्षात शिकत आहे. त्यामुळं पोलीस तिच्या शोधात आहेत.

जेएनयू हल्ल्याच्या घटनेत नाव समोर आल्यानंतर कोमल शर्मानं स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे. जेएनयू हिंसाचाराच्या व्हिडिओत चेहरा झाकलेली मुलगी दिसत आहे, ती मी नाही, असं तिनं म्हटलं आहे.

Leave a Comment