शाहीनबाग: आंदोलन न थांबवता टप्पाटप्प्यानं केलं महिलांनी केलं मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी आंदोलनात खंड पडू नये म्हणून आज शनिवारी टप्पाटप्प्याने विधानसभेसाठी मतदान केलं. शाहीन बागमध्ये विरोध प्रदर्शनात बसलेल्या काही महिलांनी सकाळीच्या वेळेला मतदान केले तर काहींनी दुपारी मतदानाचा हक्क बजावला. तर उर्वरित महिलांनी संध्याकाळी मतदान केले. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शाहीन बागमध्ये मोठ्या संख्येत महिला सीएए आणि एनआरसी विरोधात धरणे आंदोलन करता आहेत. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शाहीन बागच्या आंदोलनाला प्रचारात धार्मिक वळण देण्याचा प्रयन्त करत येथील आंदोलनाला लक्ष करण्यात आलं होत.

आज सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळच्या ६ वाजेपर्यंत दिल्लीतील ७० विधानसभा जागांवर मतदान पार पडले.मतदान केंद्रावर जोरदार सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिल्ली विधानसभेला आम आदमी पक्षाने सर्व ७० जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस ६६ आणि भाजप ६७ जागा लढवत आहेत. भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी ३ जागा सोडल्या आहेत. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार वगळता यावेळी १४८ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान, २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी तब्बल १५ टक्के कमी मतदान झाल्यामुळे या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार अशी शंका वाटत असतानाच वेगवेगळ्या सर्व्हेमधून बाहेर येत असलेल्या माहितीतून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येत असल्याचं चित्र दिसत आहे.एक्झिट पोलमध्ये बहुतेक लोकांनी आम आदमी पक्षाला ५० ते ५८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपला सकारात्मक भूमिका घेणाऱ्या सुदर्शन वाहिनीनेही आम आदमी पक्षाला ४५ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या जागांमध्येही १ ते ३ अशी वाढ दर्शवली असून त्यांना इतक्याच जागा मिळतील असा अंदाज आहे. एकूणच जनता अरविंद केजरीवाल यांना अजून ५ वर्षं काम करण्याची संधी देणार हे चित्र एक्झिट पोलमधून तरी स्पष्ट झालं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment