देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. अपघातात विधानपरिषदचहे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. फडणवीस यांना इजा झालेली नाही अशी माहिती समजत आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. दरेकर यांनाही किरकोळ दुखापत झाली. देवेंद्र फडणवीस आणि अन्य सर्व सुखरुप असल्याची माहिती आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौर्‍यावर होते. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला.  जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेत्यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला.

Leave a Comment