शिवसेनेच्या स्वप्नांचा चक्काचूर करत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राजकारण म्हणजे काय याचा अनुभव आता महाराष्ट्रातील जनता घेत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्टपती राजवट एका रात्रीत हटवून शनिवारच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी अजून वेळ असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे.

महाविकासआघाडी सरकार बनवणार या बातम्या शुक्रवारी रात्रीपर्यंत माध्यमातून पेरल्या जात असताना, शरद पवार, जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेतून नवीन सरकार स्थापनेचा संदेश दिला होता.

आता या सगळ्या नाट्यानंतर शरद पवार यांची या प्रकरणात नक्की काय भूमिका आहे? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment