मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.

आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या मूळ गावचा आपल्याला विसर पडत नाही असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.

या खानदेश महोत्सवाच्या माध्यमातून खानदेशातील लोक एकत्र आले. आपल्या संस्कृतीचं सादरीकरण या महोत्सवात झाले. मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं मिश्किलपणे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान राजकीय मुद्दे बाजूला ठेवून कार्यक्रमाच्या अनुषंगानं फडणवीसांनी भाषण केलं. यावेळी माजी पालकमंत्री गिरीष महाजन, महापौर सतीश कुलकर्णी इतर मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा –
मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात
शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?
हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार
वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले
अजित दादा म्हणजे सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री !

Leave a Comment