धनंजय मुंडे सकाळपासून नॉट रिचेबल, अजित पवारांना बळ धनंजय मुंडेंचंच?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा मागील महिनाभरात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवली. निवडणूक प्रचारावेळी तुम्ही कुणाच्याही नादाला लागा पण शरद पवारांच्या नादाला लागू नका असं सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांनीसुद्धा शनिवारी सकाळी अजित पवारांसोबत शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासहित आणखी किती नेते राष्ट्रवादी सोडणार हे आज स्पष्ट होणार आहे.

अजित पवारांची सावली म्हणून काम करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच अजित पवारांना पाठिंबा देत भाजपशी हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला का? अशी चर्चा आता रंगत आहे. अजित पवार, धनंजय मुंडे यांचे फोन नॉट रिचेबल लागत असल्याने राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसणारे मुख्य मोहरे हेच अशी चर्चा आता होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment