करण जोहरच्या अडचणीत वाढ! धर्मा प्रोडक्शनच्या माजी डायरेक्टरला NCB ने केली अटक

मुंबई । सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर NCBने श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोण यांना समन्स पाठवला. दरम्यान, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या माजी डायरेक्टर क्षितिज रवि प्रसादला NCB ने अटक केली आहे.

यापूर्वी क्षितीज प्रकाशला जेव्हा एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या घरातून गांजाही सापडला होता. क्षितीज प्रकाश धर्मा प्रोडक्शनचं मोठं नाव आहे आणि इतर मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा त्याने काम केल आहे. आता त्याच्या अटकेनंतर एक मोठा मासा एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं जातं आहे.

 

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये क्षितीज प्रसाद हे फक्त एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसरच नाही तर एक मोठं नाव आहे. क्षितिज प्रसाद यांनी धर्मा प्रोडक्शनच्या आधी बालाजी टेलिफिल्मस, शाहरूख खानची रेड चिलीज आणि जॉन अब्राहम प्रोडक्शन हाऊससाठीही काम करत होता. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता होती.

याशिवाय धर्मा प्रोडक्शनचा असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडाची सुद्धा चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आली होती. तसच करण जोहरच्या घरी ड्रग्स पार्टी झाली असा आरोप करत अनेक लोकांकडून करण जोहर आणि त्या पार्टीला उपस्थित सेलिब्रिटीजची चौकशी अशी मागणी होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात करण जोहरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न एनसीबी करणार हे निश्चित.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com