ऐकावे ते नवलंच ! कॉग्रेस भवनातून कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान चोरट्याने केल्या उपस्थितांच्या ‘चपला’ लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । धुळ्यामधे चोरीचे प्रमाण इतके वाढले आहे कि चोरटे आता हाती लागेल ते गायब करत आहेत .शहरातील टॉवर बगीच्या जवळ असलेल्या कॉग्रेस भवनात गुरवारी सकाळी नऊ वाजता आगामी जिल्हा परिषद निवडणुक बाबत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गुरुवारी अजबच प्रकार मेळाव्यात पहिला मिळत आहे. एरवी नेहमी बैठकीच्या वेळेस तुरळक उपस्थितीत मेळावा होतो. परंतु कॉग्रेस भवनात कार्यकर्ता मेळाव्याला आगामी निवडणुक बाबत मार्गदर्शनासाठी आलेले निरीक्षक कल्याण काळे यांनी बोलण्यास सुरवात केलीच होती. ते उपस्थित कार्यकर्त्यांना सभागृहात जागा आहे. पुढे सरका मागील लोकांना जागा द्या …,आत या असे आवाहन करत असताना चोरट्यांनी संधी साधत भैय्या पाटील यांचे खिशातील रोख रक्कम 7000 हजार व उपस्थितांचे पादञाणे लंपास करत चोरटा पसार झाला.

यामुळे काही काळ बैठकीच्या वेळी गोंधळ उडाला. या बैठकीस माजी मंञी शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहर अध्यक्ष युवराज करनकाळ, डॉ.दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, रमेश श्रीखंडे, भगवान पाटील व कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment