प्रकाश आंबेडकरांचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी ।

विशेष प्रतिनिधी । सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे सेर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर व्यक्त केले. आंबडेकर एका प्रचारसभेत बोलत होते. गेल्या काही दिवसापासून सावकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीच्या चर्चेला जोर धरत असताना परोक्ष आंबेडकर यांनी आपला विरोध दर्शवला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, सावरकर म्हणजे एक माणूस पण दोन चेहरे. ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणाऱ्या पत्री सरकारला पकडून देण्याचे काम सावरकरांच्या हिंदू महासभेने केले होते. सावरकरांनी आपल्या संघटनेतील कार्यकर्त्याला हे करु नका असे कधी सांगितले नाही. अंदमानातून यातना भोगून आलेल्या क्रांतीकारकाने पत्री सरकारमधील क्रांतीकारकांना त्याच यातना भोगायला लावल्या.त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे.

देश पारतंत्र्यात होता तोपर्यंत सावरकर हे क्रांतीकारक याबद्दल दुमत नाही. त्यांचा तो कालखंड हिरोचा होता. त्यांचा दुसरा कालखंड तपासला पाहिजे. हिंदू महासभेचा कालखंड तपासला पाहिजे असेही आंबेडकर यांनी नमूद केले.

Leave a Comment