डाॅ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष उलटली तरी खून्यांचा पत्ता नाही, नेटीझम्स मधे संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांच्या खूनाला येत्या २० आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाट सुटलेले आहेत. आरोपींना पकडण्यात शासन यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभुमीवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडियावर निषेध व्यक्त केला जात आहे. #WhoKilledDabholkar आणि #JawabDo हे दोन हॅशटॅग वापरुन नेटकरी सरकारला जवाब विचारत आहेत.

२० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या एकामोगामाग एक हत्या करण्यात आल्या. यातील गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांचा तपास लावण्यात कर्नाटक पोलीसांना यश आले आहे. सनातन संस्थेचा विचारवंतांच्या हत्येमागे हात असल्याचे तपासातून पुढे येत आहे. डाॅ. दाभोळकरांच्या खूनाला पाच वर्ष उलटली असतानासुद्धा त्यांच्या खून्यांचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलीसांना यश आलेले नाही. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र अंनिस कडून निषेध व्यक्त केला जात आहे. #WhoKilledDabholkar आणि #JawabDo हे हॅशटॅग वापरुन दाभोळकर यांच्या विचारांचे नेटकरी डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर यांची हत्या कोणी केली या प्रश्नाचे उत्तर सरकारला विचारत आहेत.

इतर महत्वाचे लेख – 

Leave a Comment