मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी ।  जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित देसाई जखमी झाले आहेत. करवीर पोलिसांनी याप्रकरणी अविनाश शंकर गवळी, विजय विलास पाटील, अभिजित शीतलकुमार जिरगे या संशयितांना अटक केली.

घटनेसंदर्भात अधिक माहिती आशी की, कोल्हापूर शहरालगतं असणाऱ्या जीवबा नाना पार्क येथील ‘हॉटेल ऑन द रॉक्स’ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकांशी संबधित नऊ जण पार्टीसाठी आले होते. काही वेळानंतर त्यांनी दंगा करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी करवीर पोलिस ठाण्याला या प्रकाराबाबत माहिती कळवली.  त्यानंतर फौजदार दत्तात्रय शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल रणजित देसाई हे पोलिस कर्मचारी पावणेअकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या टोळक्याला हटवण्यास सुरुवात केली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेले तरुण पोलिसांच्या अंगावर धाऊन आले. त्यांनी शिविगाळ करत ‘धक्कबुक्की करण्यास सुरुवात केली.

अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत अविनाश गवळी, विजय पाटील, अभिजित जिरगे यांना ताब्यात घेतले. हे करत असताना अन्य तरुणांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांना झालेल्या धक्काबुक्कीत त्यांचे कपडे फाटले. झटापटीत पोलिस कर्मचारी देसाई यांच्या बोटांना दुखापत झाली. पोलिसांनी खाक्या दाखवून तीन संशयितांना ताब्यात घेतले तर अन्य तिघे पळून गेले. सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment