मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

शुक्रवारी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंची भेट घेतली होती.

त्या मतावर खडसे ठाम

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी पक्ष नेतृत्वाकडे माझ्या उमेदवारी विषयी नाराजी व्यक्त केली होती या माझ्या मतावर मी ठाम आहे असे देखील एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Leave a Comment