साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.

सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. दीपक पवार आणि दिलीप वाघ यांना ईव्हीएमची तपासणी अभिरुप मतदान घेऊन करून दाखवण्यात आली होती. त्यावेळी कोणतीही शंका त्यांनी उपस्थित केली नव्हती. माध्यमांना खोटी माहिती पुरवल्याबद्दल दीपक पवार यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी याबाबद्दल खुलासा केला आहे.

 

Leave a Comment