स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून छळ करणाऱ्या बापाला अटक..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून वडीलच मुलींचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील सिडको, एन-७ परिसरातील बापानेच दोन अल्पवयीन मुलींचा घृणास्पद छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी बापाला अटक केली आहे.

बेरोजगार पती कंपनीत कामाला जाणा-या पत्नीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करायचा. तसेच पत्नी कामावर गेल्यानंतर सात आणि तेरा वर्षीय मुलींसमोर मोबाइलवर अश्लिल व्हिडीओ बघून शिवीगाळ करायचा. यासोबतच आंघोळीला जाताना मुलींसमोर नग्न होऊन बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवायचा.

वडिलांच्या या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने शनिवारी अखेर सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी या बापाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.

Leave a Comment