मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.

गुगल मॅपवर बँकांची एटीएम सेंटर, हॉटेल, रुग्णालये, शाळा आदी विविध प्रकारची माहिती मिळत असते. त्याप्रमाणे आता मतदान केंद्रांचीही माहिती मिळू शकणार आहे. त्यासाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे गुगल टॅग करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये मतदानाचा टक्का ५० टक्क्यांहून कमी होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेली मतदान केंद्रे शोधण्यात आली आहेत.

ही केंद्रे असलेल्या परिसरात मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. पुण्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासासाठी व्होटर स्लीप या घरोघरी पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती मतदारांना समजणार आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment